Our News
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग मानले जाते . तंत्रज्ञानातील नवनवीन शाखा विद्यार्थिनींच्या समोर आव्हान घेवून येत आहेत . त्यातीलच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी ज्ञानशाखा .
रयत शिक्षण संस्थेने या वर्षीपासून संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी ए.आय . हा नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे .
सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींना हा अभ्यासक्रम उत्तम पद्धतीने अभ्यासता यावा यासाठी आपल्या निरागावातील प्राचार्य श्रीमंत भोसले प्रतिष्ठान यांच्यामार्फत विद्यार्थिनींना सुसज्ज असा ए .आय . कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे .
आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी निरा गावची कन्या अलिषा शहा कजान फेडरल युनिव्हर्सिटी रशिया येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून आल्याबद्दल तिच्या हस्ते विद्यालयातील ध्वजारोहण घेण्यात आले. यावेळी प्राचार्य श्रीमंत भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विलास यादव, जेष्ठ सदस्य डॉक्टर अनिल राजे निंबाळकर , कार्याध्यक्ष शांतीकुमार कोठडीया , सुदर्शन जैन, बंडोपंत काकडे तसेच प्रतिष्ठान मधील सर्व संचालक, सदस्य, माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच इतर सदस्य व मान्यवरांच्या हस्ते सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयामधील सुसज्ज ए .आय .कक्षाचे उद्घाटन करण्यात आले .
यावेळी विद्यालयातील इयत्ता आठवी अ च्या काही विद्यार्थीनींनी भारतीय तिरंगा ही थीम लक्षात घेऊन पाककलेचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी सर्व पदार्थांचा आस्वाद सर्व मान्यवरांनी घेतला.
त्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी विद्यालयामार्फत सर्व भोसले प्रतिष्ठानातील सदस्यांचे आभार मानले .
आज निरा येथील दोन्ही शाळेत 15 ऑगस्ट निमित्त खालील प्रतिष्ठानचे मान्यवर सभासद सदस्य आणि उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे श्री शांतीलाल कोठडीया, जेष्ठ संचालक :डॉ अनिलराजे निंबाळकर, रमेश बेजेकर महेश गिरमे, सुदर्शन जैन , अनिल टकले, बंडू काकडे , बबन गायकवाड , वीरकर, डॉ दगडे सतीश रोकडे,दत्ता निगडे, मनोज शहा, आदेश गिरमेसो आणि महिला सदस्य निलिमा घाडगे, शोभा काटकर, सौ सुजाता दगडे ,तनुजा शहा, आणि इ. स्थानिक ग्रामस्थ, मुख्याध्यापक श्री धुमाळ सर आणि सौ नाईकवाडी मॅडम मुख्याध्यापिका कन्या शाळा, शिक्षक स्टाफ , प्रमुख पाहुणे कुमारी अलीशा शहा, आणि श्री सत्यम जगदाळे यांचे हस्ते झेंडावंदन झाले.इत्यादी सदस्य उपस्थित होते.
यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि कॉम्प्युटर लॅब चे डॉ अनिल राजे निंबाळकर, रमेश बेजेकर उद्घाटन यांचे हस्तेकरण्यात आले प्रतिष्ठानच्या कार्याचा खूप कौतुक करण्यात आले आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना, ग्रामस्थ व्यावसायिक यांना यात सदस्य सहभागी करून ट्रस्ट मार्फत शाळेचे कार्य आपण करू या असे दत्ता आबा चव्हाण यांनी सांगितले. यावेळी स्कूल कमिटी प्रमुख श्री दादा चव्हाण आणि इतर सर्व सदस्य , निरेतील सरपंच उपस्थित होते.

