School Visit
सर्व सदस्य, रयत शिक्षण संस्थेच्या कन्या शाळा नीरा येथे मा.सौ सुप्रियाताई सुळे, कुलाधिकारी रयत शिक्षण संस्था यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी दोन्ही
शाळेतील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी प्रा.भोसले प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री शांतिकुमार कोठाडीया आणि श्री बंडोपंत काकडे आणि इतर सदस्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली तसेच यावेळी आपण माजी विद्यार्थ्यांनी २०२० मध्ये स्थापन केलेल्या प्रा.श्रीमंतराव भोसले प्रतिष्ठानच्या सहा वर्षांच्या कार्याची सविस्तर माहिती त्यांना सादर केली.
यावेळी स्कूल कमिटी अध्यक्ष सौ चित्राताई शहा,श्री दादा चव्हाण, आबा चव्हाण, स्कूलच्या मुख्याध्यापिका, तसेच निरेतील इतर सर्व वरिष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते

